⚜️सामान्य ज्ञान⚜️

⚜️सामान्य ज्ञान⚜️

  1. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ? - शुक्र
  2. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता ? -पौर्णिमा
  3. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता ? - अमावस्या
  4. मोरगावच्या गणपतीचे नाव काय ? - मोरेश्वर
  5. नागपंचमी हा सण कोणत्या मराठी महिन्यांत येतो ?  -  श्रावण  
  6. 'वाचणे' या शब्दाला इंग्रजी शब्द सांगा? -  Read  
  7. १ लाखामध्ये १ अंकापुढे  किती शून्य असतात? -  पाच 
  8. वर्षाचे किती महिने ३१ दिवस असतात? -  ७ (जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर)
  9. दोन दिवस म्हणे किती तास? - ४८ तास (२४+ २४)
  10. त्रिकोणाला किती बाजू असतात? - तीन
  11. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? -  पश्चिमेला 
  12. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ? -  कल्पना चावला 
  13. मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? - कल्ले 
  14. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ? - ५० मिनिटे
  15. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?-डॉ.स्वामीनाथन.
  16. यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ?- अलाहाबाद.
  17. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे ? - अंदमान,निकोबार,लक्षद्वीप.
  18. धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? - रसिका.
  19. देवगिरी किल्ला कुणी उभारला ? -  यादव.
  20. पालीच्या गणपतीचे नाव काय ? - बल्लाळेश्वर
  21. महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ? - विनायक
  22. सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय ? - सिध्दीविनायक 
  23. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ? - महागणपती
  24. नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ? -दिल्‍ली.
  25. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू यांचे पूर्ण रूप काय आहे ? - वर्ल्ड वाइड वेब.
  26. शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ? - कागल.( कोल्हापूर )
  27. इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण होता ?- मुसोलिनी.
  28. संगणकावर आपण कुठल्या प्रणालीच्या आधारे काम करतो ? - विंडोज
  29. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे पूर्ण नाव सांगा.  -  श्री.नरेंद्र दामोदरदास मोदी 
  30. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? - महात्मा फुले
  31. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला होता ?  -  प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर
  32. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? -  ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  33. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते ?  -  गोऱ्हे
  34. रविवार नंतर कोणता वार येतो ? - सोमवार  
  35. आई या शब्दाला समानार्थी शब्द सांगा ? - माता , माय , जननी ...
  36.  निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये किती दात असतात? - ३२
  37. पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे? - नायट्रोजन 
  38. एक सहस्र वर्षात किती वर्षे येतात? - १००० वर्षे
  39. नथ्थुराम गोडसे यांनी कोणत्या तारखेला महात्मा गांधीची हत्या केली ? - ३० जानेवारी १९४८.
  40. भारताला स्वातंञ्य मिळाले त्यावेळी भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण होते ? - आचार्य कृपलानी.
  41. मार्च १९२३ मध्ये अहमदाबाद येथे कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली ? - चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू.
  42.  तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला राज्यकर्ता कोण होता ? - हैदराबादचा निजाम. 
  43. कोणाला 'भारतीय अर्थशास्ञाचे जनक' म्हणून ओळखतात ? - दादाभाई नौरोजी.
  44. विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली ? -१८५६.
  45. गुढीपाडवा हा सण कोणत्या मराठी महिन्यांत येतो ? - चैत्र 
  46. 'नाचणे ' या शब्दाला इंग्रजी शब्द सांगा? - Dance 
  47. महाराष्ट्राचे पठार हे - - - या खडकाने बनलेले आहे. - बेसॉल्ट
  48. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते आहे ? - भगूर जि. नाशिक.
  49. जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो? - ७ एप्रिल
  50. मुख्य दिशा किती आहेत ? - चार
  51. उपदिशा किती आहेत ? - चार
  52. मुख्य दिशांची नावे सांगा ? - पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
  53. उपदिशांची नावे सांगा ? - ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य.
  54. पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ? - ईशान्य
  55. पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती ? - आग्नेय
  56. दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती ? - नैऋत्य
  57. पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ? - वायव्य
  58. सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती? - पूर्व
  59. सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ? - पश्चिम
  60. आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असते? - दक्षिण
  61. आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असते? - उत्तर
  62. पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?- पश्चिम
  63. दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ? - उत्तर
  64. १  डझन केळी = किती केळी ? -  १२ केळी
  65. १ रीम कागद = किती कागद ? - ४८० कागद
  66.  १ वर्ष = किती महिने ? - १२ महिने
  67. १ आठवडा = किती दिवस ? - ७ दिवस
  68. १ महिना =  किती दिवस ? -  ३० / ३१ दिवस
  69. १ वर्ष = किती दिवस ? - ३६५  / ३६६ दिवस
  70. १ मनिट = किती सेकंद ? - ६० सेकंद
  71. १ तास = किती मिनिटे ? - ६० मिनिटे
  72. १ दिवस = किती तास ? - २४ तास
  73. १ तास = किती सेकंद ? - ३,६०० सेकंद
  74. १ दिवस = किती सेकंद ? - ८६,४०० सेकंद
  75. १ मीटर = किती सेंटिमीटर ? - १०० सेंटीमीटर
  76. १ लीटर = किती मिलीमीटर ? - १००० मिलीलीटर
  77. १ किलो = किती ग्रॅम ? - १००० ग्रॅम
  78.  १ क्विंटल = किती किलोग्रॅम ? -  १०० किलोग्रॅम
  79. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे पूर्ण नाव सांगा . -  श्री.नरेंद्र दामोदरदास मोदी 
  80. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? - महात्मा फुले
  81. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला होता ?  -  प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.
  82. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? -  ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  83. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?  -  गोऱ्हे कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे ? - मिश्र अर्थव्यवस्था.
  84. गुगल हे काय आहे ? - सर्च इंजिन.
  85. कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ? - सिंहगड.
  86. रिजर्व बॅंकेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ? - १जानेवारी १९४९
  87. बिल गेट्स यांच्या कंपनीचे नाव काय आहे? - मायक्रोसाॅफ्ट 
  88. १ टन = किती किलोग्रॅम ? - १००० किलोग्रॅम
  89. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सलूनो' म्हटले जाते ? -रक्षाबंधन.
  90. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत ? - बिल गेटस्.
  91. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? - ४ टक्के.
  92. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी महाष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण ? - वि.स.खांडेकर..................
  93. आपल्या देशाचे नाव काय आहे ? - भारत 
  94. 'गाणे' या शब्दाला इंग्रजी शब्द सांगा? - Sing  
  95. महाराष्ट्राशेजारील दोन राज्यांची नावे सांगा. - गोवा , गुजरात 
  96. २५ गुणिले १० = किती ? - २५० 
  97. रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो ? - व्हिटॅमिन ए
  98. धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ? -  नंदुरबार.
  99. गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ? -: हरियाणा.
  100.  अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ? -  चौंडी.( अहमदनगर )
  101. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ? -  दिल्ली.
  102.  शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ? - गुरूग्रंथ साहेब.
  103. एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नाशिक.
  104. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? - रायगड.
  105. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ? - दुर्गापूर.
  106. चादरीकरीता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ? - सोलापूर.
  107. हिमरू शालीकरीता प्रसिद्ध असलेले शहर कोणते ? - औरंगाबाद 
  108. बालक्रांतीकारक शिरीषकुमारचे स्मारक कोठे आहे ? - नंदुरबार
  109. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ? - आंबोली ( सिंधुदुर्ग जिल्हा)
  110. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे ? - रायगडावर
  111. नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे ‌? - गोदावरी
  112. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ? - जायकवाडी
  113. अजिंठा, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ? - छ. संभाजी नगर
  114. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छ. संभाजी नगर
  115. साल्हेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ? - नाशिक
  116. सप्तश्रृंगी गड कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नाशिक
  117. नाशिक जिल्ह्यात विमान तयार करण्याचा कारखाना कोठे आहे ? - ओझर
  118. 'तोरणमाळ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नंदुरबार
  119. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? - पांझरा
  120. 'खासबाग' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान कोठे आहे ? - कोल्हापूर
  121. 'सावरपाडा एक्स्प्रेस' कोणाला म्हणतात ? - कविता राऊत
  122. महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ? - लता मंगेशकर
  123. भारत देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे ? - जनगणमन
  124. भारताचे राष्ट्रगीत गायनासाठी किती वेळ लागतो ? - ५२ सेकंद
  125. भारत देशाचे राष्ट्रीय गीत कोणते ? - वंदे मातरम्
  126. भारत देशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ? - रविंद्रनाथ टागोर
  127. भारत देशाचा स्वातंत्र्यदिन कोणता आहे ? - १५ ऑगस्ट
  128. भारत देशाचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे ? - २६ जानेवारी
  129. भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ? - मोर
  130. भारतीय राष्ट्रध्वजाचे नाव काय ? - तिरंगा
  131. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? - आंबा
  132. 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे ? - बंकिमचंद्र चटर्जी
  133. कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ? - कबूतर
  134. पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ? - देवमासा (व्हेल)
  135. सूर्यापासून आपणास आपणास कोणत्या दोन गोष्टी मिळतात ? - प्रकाश व उष्णता
  136. बी फळाच्या बाहेर असणारे कोणते फळ आहे ? - काजू
  137. कल्पवृक्ष असे कोणत्या झाडाला म्हणतात ? - नारळ ( माड )
  138. आपल्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी कोणते चक्र आहे ? - अशोकचक्र
  139. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - नंदुरबार
  140. पंढरपूर शहरातून वाहणारी "चंद्रभागा" म्हणजे ही नदी होय ? -:भीमा
  141. हळदीची प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्रात कोठे आहे ? - सांगली
  142. "यंग इंडिया" हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? -  म.गांधी
  143. प्रसिद्ध "पुणे करार" कोणत्या दोन नेत्यांच्या मध्ये झाला होता ? -  म.गांधी व डाॅ.आंबेडकर(24सप्टेंबर 1932)
  144.  उंदरावरील पिसवांमुळे कोणता रोग होतो ? - प्लेग
  145. आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला ? - १५ ऑगस्ट १९४७  
  146. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - रायगड 
  147. शरीराचे तापमान मोजण्याकरिता कोणते यंत्र वापरतात?  - थर्मामीटर 
  148. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? - टंगस्टन
  149. ५ तास ३३ मिनिटे = किती तास ? -  ५.५५ तास
  150. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? -खोपोली.
  151. महाराष्ट्राला लागून किती राज्याच्या सीमा आहे ? - सहा.
  152. महाराष्ट्रात तांबे सर्वांत जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडते ? - चंद्रपूर.
  153. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ? - प्रवरानगर.
  154. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ? - नागपूर
  155. मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ? - पोळे
  156. घोड्याच्या घरास काय म्हणतात ? - तबेला
  157. कोंबडीच्या घरास काय म्हणतात ? - खुराडे
  158. उंदराच्या घराला काय म्हणतात ? - बीळ
  159. चिमणीच्या घराला काय म्हणतात ? - घरटे
  160. सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ? - गुहा
  161. माणसाच्या निवा-यास काय म्हणतात ? - घर 
  162. वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ? - गुहा
  163. गाई - गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ? - गोठा
  164. पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ? - थवा 
  165. फुलांच्या समूहाला काय म्हणतात ? - गुच्छ
  166. फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ? - ताटवा
  167. बांबूच्या समूहाला काय म्हणतात ? - बेट
  168. बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ? - हंबरणे
  169. म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ? - रेकणे
  170. म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ? - रेडकू
  171. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ? - शिंगरु
  172. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ? - बच्चा ,. बछडा
  173. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ? - वासरू
  174. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ? - पाडस, शावक
  175. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ? - करडू
  176. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ? - पिल्लू
  177. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ? - छावा
  178. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ? - कोकर
  179. गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ? - शिंगरु
  180. प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ? - सिंह
  181. फुलांचा राजा कोणाला म्हणतात ‌? - गुलाब
  182. पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ? - गरूड
  183. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ? - तिरंगा
  184. भारताचे राष्ट्रगीत कोणते ? - जनगणमन
  185. फळांचा राजा कोणाला म्हणतात ? - आंबा
  186. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ? - कमळ
  187. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? - मोर
  188. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? - वाघ
  189. तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ? - शेंगदाणा
  190. आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? - श्री.एकनाथ शिंदे   
  191. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? - छत्रपती संभाजीनगर  
  192. जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? - ५ जून
  193. इंग्रजी वर्णमाले मध्ये किती स्वर असतात? - ५ स्वर (ए, ई, आय, ओ, यू)
  194. दोन दिवस म्हणे किती तास? - ४८ तास (एका दिवसाचे २४ + दुसऱ्या दिवसाचे २४)
  195. एमटीडीसी (MTDC)चे पूर्णरूप काय आहे ? - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.
  196. जगातील सर्वांत खोल महासागर कोणता आहे ? - पॅसिफिक महासागर.
  197. भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात ? - विक्रम साराभाई.
  198. 'विद्यानंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - दामोधर केशव पांडे.
  199. भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे ? - तिरंगा.
  200. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ? - १ मे १९६०
  201. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे ? - मुंबई
  202. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ? - नागपूर
  203. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? - अरबी
  204. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? - ३६
  205. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ? - अहमदनगर
  206. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - कळसूबाई
  207. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती ? - तापी / नर्मदा इ.
  208. महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ? - गोदावरी
  209. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ? - १६४६ मीटर
  210. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ? - त्र्यंबकेश्वर (नाशिक)
  211. कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात ? - अरबी
  212. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ? - महाबळेश्वर ( सातारा ) 
  213. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? - आंबा
  214. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ? - हरियाल
  215. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे ? - शेकरू
  216. भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे ? -भीमाशंकर ( पुणे )
  217. महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतो ? - १ मे
  218. भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे ? - पश्चिम
  219. महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पाडले आहेत ? - सहा
  220. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? - मराठी
  221. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? - यशवंतराव चव्हाण
  222. महाराष्ट्र राज्याचा राज्यफूल कोणता ? - ताम्हन / मोठा बोंडारा
  223. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? - गंगापूर (नाशिक)
  224. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? - सावित्रीबाई फुले
  225. नागपुरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ? - संत्री
  226. जळगावाचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ? - केळी
  227. नाशिकचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ? - द्राक्षे
  228.  कोकणात कोणते पीक जास्त पिकते ? - भात ( तांदूळ )
  229. नकाशात सागरी ‌भाग कोणत्या रंगाने दाखवतात ‌? - ‌ निळ्या
  230. समुद्राच्या पाण्यापासून काय तयार केले जाते ‌? - मीठ
  231.  अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ? - रायगड
  232. भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे ? - कन्याकुमारी.
  233. राजश्री शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय ? - यशवंतराव जयसिंगराव घाटगे.
  234. जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो ? -  ७ एप्रिल
  235. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? - जिनिव्हा
  236. 'इन्कलाब जिंदाबाद'ही घोषणा कोणी दिली होती ? - भगतसिंग
  237. जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ? - मिठागर
  238. महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ? -  ८०० किमी.
  239. चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ? - ओरिसा.
  240. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ? -  कोल्हापूर.
  241. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ? - बीड
  242. चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ? -  कर्नाटक.