⚜️आशिर्वाद⚜️
एका हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असायची, त्याचा फायदा घेऊन एक माणूस पैसे न देता जायचा. मी तो माणूस रोज पाहतो पण हॉटेल मालकाला कधी सांगितलं नाही.
एक दिवस विचार केला चला हॉटेल मालकाला सांगू, मी त्या माणसाबद्दल हॉटेल मालकाला सांगताच तो म्हणाला हे सांगणारे तुम्ही पहिले ग्राहक नाहीत आणि अजून बरेच ग्राहक हे सांगुन गेले आहेत.
मालकाचं बोलणं ऐकून मी विचारलं, त्याला का थांबवत नाही तर मालक म्हणाला एकदा मी त्या माणसाच्या मागेमागे गेलो तेंव्हा कळलं की तो भिकारी आहे आणि वडे खाऊन सरळ देवाच्या मंदिरात जातो..
जेंव्हा आपण गुपचूप देवाच्या मंदिरात गेलो तेंव्हा ती व्यक्ती देवासमोर आहे प्रार्थना करत होती कि आजपेक्षा जास्त गर्दी उद्या त्या हॉटेलमध्ये होऊ द्या म्हणजे मला वडे खाऊन गर्दीतून बाहेर पडता येईल.
मग मला कळलं हॉटेल फक्त आपल्या कष्टाने नाही तर अशा कित्येक लोकांच्या आशीर्वादाने चालत आहे.
तात्पर्य:- आयुष्यात कधी कधी आपण आपल्या यशावर गर्व करू लागतो.. पण आपल्या यशात बरेच जण सामील असतात..त्यात कित्येक अनोळखी आशिर्वाद आपल्याला नकळत मिळालेले असतात.