⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 110वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तुला खाण्याचा कोणता पदार्थ बनवता येतो?
- झेब्रा कोणत्या प्राण्यासारखा दिसतो? घोडा की हत्ती?
- नारळामध्ये बिया असतात का?
- आपल्याला बरे करण्यासाठी डॉक्टर आपल्याला काय देतो?
- इतरांशी बोलतांना चांगल्या शब्दांचा वापर करून बोलणे, चांगले की वाईट?
- असा कोणता रंगबिरंगी पक्षी आहे जो मासे पकडतो?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर
,