⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 119वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- तू तुझा आनंद कश्याप्रकारे व्यक्त करशील?
- बेडूक काय खातात?
- हात धुतल्यानंतर ते सुकविण्यासाठी तु काय वापरते?
- शाळेत नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुला कोण मदत करतात?
- शाळेतील एखाद्या कामात शिक्षकांना मदत करणे, चांगले की वाईट?
- चिमणी काय खाते?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर