आई फूकणी घेउन दोन लाकडाच्या मधी
थोडी पेटलेल्या गोवऱ्याला फू फू फूकायची
स्वयंपाक घरात, घरात बाहेरच्या व
अंगणात सर्वत्र धूरधूरच व्हायचा,
धूरानं अखं घरातील माणसाच्या
डोळ्यातून नाकातून पाणी वहायचं,
मग सांगा कश्याला लागायचा
डोळ्याला चष्मा ?
पूर्वी घरात चूल असायची
आई चूल पेटविताना फूकणीनं फूफू फूकायची
आई दमली की कधी आजी फूकायची
तर कधी ताई तर कधी काकू तर
कधी मी पण मग साऱ्यांच्याच
हातात फूकणी फिरायची
मग सांगा कश्याला लागायची
प्राणायम कपाल भारती?
पूर्वी घरात चूल असायची
आई सकाळी उठली की चूल पेटवायची
फूकणीचा आवाज झोपेच्या कानात जायचा
फूफू मधूर आवाजाने आम्ही उठायचो
मग कश्याला हवी सकाळी
भूपाळी आणि घड्याळाचा गजर?
पूर्वी घरात चूल असायची
थंडीच्या दिवसात आम्ही भावंडे
आईच्या, चुलतीच्या आवती भोवती
चूली जवळच गरम गरम शेकून घेत
गप्पा गोष्टी करत जेवण करायचो
हाच आमचा नेहमी संवाद घडायचा
आपापसात प्रेम माया वाढायची
मग कश्याला हवं
आता सारखं डायनिग टेबल, मोबाईल व टिव्ही?
पूर्वी घरात चूल असायची
आई फूकणीनं फूफू फूकून चूल पेटवायची
धूराचा लोट चूली वरच्या भांड्यात घूसायचा
त्या भाड्यांतील भाजी नेहमीच चवीची लागायची
मग सांगा कश्याला हवा
हाॅटेल मधला महागडा पनीर टिक्का मसाला ?
पुर्वी घरात चूल असायची
आई फूकणीने चूल फेटवून
गूळाच्या चहाचा आदन आणायची
बाहेर बसलेल्या पाहूण्याला वासानंच
चहा कधी घश्यात जातोय असं वाटायचं
एवढा सुगंधित चवदार चहा बनायचा
मग सांगा कश्याला हवा
बाहेरचा अमृतूल्य चहा?
पूर्वी घरात चूल असायची
चूलीत धूरच धूर सूटायचा
घरात घराबाहेर चूल पेटविल्याचा वास यायचा
साऱ्या गावातच चूली पेटायच्या
साऱ्या गावातील घराघरात धूरच धूर व्हायचा
या धूरा मूळे कूठली आला मच्छर
कुठला आला चिकण गूणीया व डेंग्यू
सारं घरच नेहमी निरोगी असायचं
कश्याला डिडिटीची फवारणी व कश्याला हवा
मच्छरअगरबत्ती पास्ट कार्डचा धूर?