⚜️खापराची पाटी⚜️

⚜️खापराची पाटी⚜️

खापराच्या पाटीसाठी जीव तळमळायचा
अर्ध्या लेखणी साठी एक रुपया नसायचा
रातभर मिनमीनत असायची कंदिलाची वात
अभ्यास करतांना मानेचा मनका मोडायचा

बाजाराची नायलॉन थैली आमचं दप्तर होतं
टिचभर पालवात गुंडाळलेल तेचं टिफीन होतं
एक गणवेश तोच राजेशाही थाट वाटायचा
आमचे जीवन तो काळा फळांचं घडवायचा

ऑफलाईन चालायची विचारांची देवाघेवाण
ऑनलाईन पेक्षा फास्ट होतं आमचं विज्ञान
शाळेच्या मैदानात होतं होती पुस्तकांची दाटी
मोबाईल पेक्षा भारी होती ती खापराची पाटी