⚜️सोडून द्यावं....⚜️

 ⚜️सोडून द्यावं....⚜️

  • एकदोन वेळा समजावून, सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं...
  • मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं...
  • मोजक्याच लोका॑शीच ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी न पटले तर बिघडले कुठे सोडून द्यावं....
  • एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं....
  • आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  सोडून द्यावं....
  • ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.....
  • प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं....
  • आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्या नंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  सोडून द्यावं...
  • समजंल तर ठीक नाहितर हे ही सोडून द्यावं