⚜️सारे मिळुनी आपण....स्वागतगीत⚜️
सारे मिळुनी आपण, गीत स्वागताचे गाऊ
मान्यवरांना वंदन करून, स्वागत गीता गाऊ ||धृ||
रजनी अज्ञानाची, दूर करू हो साची
तारक शास्त्रे संघटनेची मिळवूया मोलाची
हीच मोहीम आपण सारे कृतीतून राबवू ||१||
शोभा निसर्गाची, वृक्ष लता वेलींची
झाडे लावा झाडे जगवा, गरज ही काळाची
पाणी अडवा पाणी जिरवा,फळाफुलांच्या बागा मिरवा
मंगलदिनी या पाहुण्यांना हार फुलांचा घालू. ||२||
कल्पना बापुजींची ग्राम विकासाची
योजना आदर्शाची महाराष्ट्र राज्याची
सप्तसूत्री आदर्शाची अण्णा हजारे पोपटरावांची
हीच सूत्रे आपण सारे कृतीतून राबवू. ||३||
गंगा विकासाची आली आपल्या दारी
फुले शाहू आंबेडकर हे गरिबांचे कैवारी
गोरगरिबा महिलांना या शेतकरी अन मागासल्यांना
विकासाच्या संधीसाठी हात मदतीचा देऊ. ||४||
सारे मिळूनी आपण गीत स्वागताचे गाऊ
मान्यवरांना वंदन करून स्वागत गीता गाऊ ||धृ||