⚜️स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी⚜️

⚜️स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी⚜️  

🔸जन्म :~ ४ फेब्रुवारी १९२२
                 रोना कर्नाटक
🔹मृत्यू :~ २४ जानेवारी २०११, पुणे
🔸वडील :~ गुरुराज जोशी
🔹गौरव :~ गौरव डॉक्टरेट डि. लिट्.
🔸पुरस्कार :~ भारतरत्‍न पुरस्कार पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार, संगीताचार्य पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार तानसेन पुरस्कार.
       
♦पंडित भीमसेन जोशी
  🔷हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.
           *💥संगीतशिक्षण 💥*
  🔶भीमसेन जोशीं वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.
   🔶भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
             *💥कारकीर्द💥*
   🔷भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.
   🔶तरुण पंडितजी त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
    🔷भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.
    🔶भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.
   🔷अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक जानेवारी २४,इ.स. २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले.
    🔶भीमसेन जोशींना अ॑नेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले.
   🔶भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.