⚜️ परिक्षार्थी नको ज्ञानार्थी व्हा....⚜️

⚜️ परिक्षार्थी नको ज्ञानार्थी व्हा....⚜️

     "आज काल आपण पाहतो विद्यार्थी हे फक्त परिक्षार्थी होत चाललेले आहेत. फक्त परीक्षेपुरता च अभ्यास करणे.  हे एक मात्र ध्येय विद्यार्थ्यांचे आहे‌. ज्ञान मिळो वा न मिळो पण परीक्षेत चांगले गुण मिळाले पाहिजे. असा विद्यार्थी विचार करतो. केवळ परीक्षेपुरताच अभ्यास करून चालत नाही. प्रत्येक गोष्ट ही कायमस्वरूपी लक्षात राहिली पाहिजे. परीक्षेपुरताच अभ्यास न करता तो ज्ञानाचा एक भाग म्हणून आपल्या स्मरणात नेहमी राहिला पाहिजे. जे  ज्ञान आपल्याकडे आहे, ते आपण वाढवले पाहिजे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने आपले ज्ञान वाटले पाहिजे आणि दुसरे ज्ञान मिळवले पाहिजे. ज्ञान हे काही काळापुरतेच मर्यादित नसते तर ते  जिवनाचा शेवट पर्यंत आपली साथ देते. ज्ञानी माणूस कधीच कोणाला वाईट बोलत नाहीत. त्याचा ज्ञानाचा वापर ते नेहमी चांगल्या कारणासाठी वापरतात. ज्ञानी माणूस हा नेहमी चांगल्या गोष्टीचे स्मरण करतो. विद्यार्थ्याने पण चांगले ज्ञान मिळवले पाहिजे. जेणेकरून ते ज्ञान आपल्या कुठे तरी, काहीतरी कामाला येईल. ज्ञान हे नेहमी वाढवले पाहिजे. विद्यार्थ्याने पण ज्ञानार्थी व्हायला पाहिजे. परीक्षार्थी तर सगळेच असतात. म्हणून आपण ज्ञानार्थी व्हायला पाहिजे. अभ्यास हा नेहमी समजून केला पाहिजे. जेणेकरून ते आपल्याला परीक्षेमध्ये तर लक्षात आलेच पाहिजे. परंतु, कोणाच्या परीक्षेत पण  ते ज्ञान वापरता  आले पाहिजे. ज्ञानवंत माणूस हा नेहमी सज्जन असतो. 
       विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मिळवले पाहिजे. परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी झालं पाहिजे. पुस्तकी ज्ञान नेहमी परिक्षेमध्ये कामी येत, पण तेच ज्ञान आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा कामी आलं पाहिजे. असे ज्ञान आपण मिळवले पाहिजे तरच जीवनामध्ये कुठे तरी आपण पुढे आहात असे म्हणता येईल. जीवनाची वाट हि खूप अवघड आहे. त्यामुळे परीक्षार्थी होण्या पेक्षा ज्ञानार्थी व्हा !!  तुमची हि परीक्षा केवळ काही दिवसच असते . पण, जीवनाची परीक्षा ही खूप काळ असते.  जीवनाच्या परीक्षेत माणसाने पास झालं पाहिजे.   शाळेतल्या परीक्षेत तर सगळेच पास होतात. त्यामुळे जीवनाची जर  परीक्षा सुखात  घालवायची असेल, तर ज्ञानार्थी व्हा....