⚜️ आपल्या घरात अपत्य म्हणून कोण जन्माला येत?⚜️
पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला या जन्मात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र शत्रू आणि सगे संबंधी नातेवाईक या जीवनातील जे काही नातेसंबंध आहेत ते सर्व मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काही द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते.
मागील जन्माची उधारी उसनवारी बाकी असते आणि तेच आपल्या मुलाबाळांच्या रूपात किंवा संतान रुपात आपल्या पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईकच जन्म घेत असतात. ज्यामध्ये शास्त्रानुसार 4 प्रकार सांगितलेले आहेत.
- पहिले म्हणजे ऋणानुबंध
- दुसरे म्हणजे पूर्व शत्रू
- तिसरे म्हणजे उदासीनता पुत्र
- चौथा म्हणजे सेवक पुत्र
आपण जर आपल्या आई-वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुली मुले आपली सेवा करतील नाही तर कोणी पाणी पाजणारे ही भेटणार नाही. असे नाही की, या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात या 4 प्रकारांमध्ये कोणताही जीव असू शकतो.
आश्चर्य म्हणजे ही गोष्ट केवळ मनुष्यावर लागू होत नसून या जनावरांवर देखील लागू होते. जनावरांची नि:स्वार्थ सेवा आणि स्वार्थ भाव ठेवून पाळणे व काम झाल्यास त्यांना घरातून काढून देणे, किंवा निरपराध जीवांना सतावणे हे देखील आपलं भविष्य ठरवतं.
- "जे पेराल तेच उगवेल निसर्गाचा नियम आहे हा." आपण या जन्मी केलेलं पुण्य पुढील जन्मात शंभर पटीने परत मिळेल. उलट कोणासोबत वाईट वागणुकीची शंभर पटीने परतफेड करावी लागेल. म्हणून चांगले कर्म करून आपल्या खात्यात पुण्याई जमा करत राहावी.
- जसे आपण जर एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते ही आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गाईला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिचे दूध बंद झाले व त्यानंतर तुम्ही तिला टाकून दिली असेल किंवा सोडून दिले असेल तर तिच तुमची ऋणानुबंध संतान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल.
- जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव आपल्या जीवनात आपला शत्रू बनवू येईल आणि त्याचा बदला घेईल. म्हणूनच जीवनात कधीही कोणाचेही वाईट करू नये. कारण निसर्गाचा हा नियमच आहे की, आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात 100 पटीने अधिक मिळते. रिकाम्या हाताने आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने जाणार. पैसे, घर, माझं, तुझं, हे सर्व येथेच सोडून जावं लागणार.
- सोबत जाईल ते फक्त आपण कमावलेलं पुण्य आणि पाप, आता काय कमवायचे ते तुम्हीच ठरवा.
- 🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा.
- 🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका.
- 🌺खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
- 🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा".