⚜️कोणता नवरा खरेदी करू...?⚜️
शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं, ज्यावर लिहिलं होतं –
“इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता.”
हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या. दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली.
मुख्य दरवाजावर सूचना लिहिलेली होती –
👇👇👇
✡ या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल. आधार कार्ड आवश्यक आहे.
✡ दुकानात एकूण ६ मजले आहेत, आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत.
✡ कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते.
✡ पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही – केवळ दुकानाबाहेर जाता येईल.
एक देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला...
पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं –
“या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत.” ती पुढे गेली...
दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात.”
ती पुन्हा पुढे गेली...
तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि देखणेही आहेत.”
हे वाचून ती थोडा वेळ थांबली, पण विचार केला, "वर काय आहे ते पाहूया..."
चौथ्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन, देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात.”
हे वाचून ती थक्क झाली. विचार करू लागली –
“खरंच असे नवरे आजकाल असतात का?”
तरीही मन नाही मानलं आणि ती वर गेली...
पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं –
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत, देखणे आहेत, घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात.”
आता तिचं डोकंच फिरू लागलं... विचार केला...
“यापेक्षा चांगलं काय असू शकतं?”
पण तिचं मन अजून समाधानात नव्हतं...
ती शेवटच्या ६ व्या मजल्यावर गेली...
सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं –
“आपण या मजल्यावर येणाऱ्या ३३३९ व्या महिला आहात. या मजल्यावर एकही नवरा नाही. हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे.
आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! डावीकडे ८ पायऱ्या आहेत, त्या थेट दुकानाबाहेर जातात.”
सारांश:-आजकाल समाजात अनेक कन्या आणि वरपक्षाचे पालक "आणखी चांगला... आणि अजून चांगला..." याच्या मागे लागून आहेत, आणि त्यातच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते आहे...