⚜️आला रे आला गोविंदा⚜️
आला रे आला गोविंदा
गोविंदा गोविंदा गोविंदा
गोकुळाष्टमीचा सण आनंदाचा
चला खेळूया गोपालकाला
आला रे आला, हंडी हा फोडण्या
मोहन मुरलीवाला
गोविंदा आला रे आला
हंडी हा फोडण्या आला
सवंगड्यांना घेऊन आला
वाजत गाजत हा गोविंदा आला
गोकुळचा चोर हा
नंदाचा पोर हा
दही दूध लोणी लुटण्या आला
गोप थरारती, कान्हा चढे वरती
पाणी टाकुनी भिजवा त्याला
आला रे आला, हंडी हा फोडण्या
मोहन मुरलीवाला
गोविंदा आला रे आला
हंडी हा फोडण्या आला
साऱ्यांचा लाडका हा कान्होबा
यशोदेचा बाई हा लाडोबा
मोहन चोर हा, लई शिरजोर हा
उंचावरी तुम्ही हंडी बांधा
असा हा श्रीहरी,
मटकी फोडी शिरी
त्याने काल्याचा आनंद लुटला
आला रे आला, हंडी हा फोडण्या
मोहन मुरलीवाला