⚜️ससा अन शिकारी⚜️

⚜️ससा अन शिकारी⚜️

  एका शिका-याने एक ससा पाळला होता.ससा खुप पांढरा शुभ्र अन चपळ होता.शिका-याला तो खुप आवडायचा.त्याला हिरवा हिरवा मऊ घास खुप आवडायचा.शिका-याने त्याच्यासाठी शेतात हिरवागार घास लावलेला.
    शिका-याचा सशावर खुप जीव होता.पण सशाला त्याच्या तावडीतून सुटून जायचे होते.ससा पळून जाण्यासाठी अनेक प्रयोग करायला लागला. सुरुवातीला शिका-याला त्याच्या या प्रयोगाची गंमत वाटायची पण नंतर शिका-याच्या ध्यानात आले की ससा पळण्याच्या मार्गावर आहे.मग शिका-याने असा डाव केला की सशाच्या ध्यानातच आला नाही.शेतक-याला माहीत होते ससा कोठून पळेल.मग शिका-याने दूरवर असा तारेचा फासा तयार केला की त्या अडकल्यावर सारे संपणार होते.ससा माञ आपल्या हुशारीतच राहीला.त्याने सारे सहजच घेतले.
    एके दिवशी शिका-याने सशाला अंगणात मोकळे सोडले.अन शिकारी कामाचे ढोंग करुन दूरवर बसला. सशाला वाटले मी खुप हुशार.खुप चपळ.त्याने तेथून पळ काढला.ससा पळत सुटला.त्याला वाटले आता मी सुटलो....पण आपल्या आयुष्याचा शेवट त्याला माहीत नव्हता.पळत असताना शिका-याने टाकलेल्या फासात तो असा अडकला की त्याला बाहेर पडणे अशक्यच होते.मग सशाच्या लक्षात आले की आपली हुशारी काही कामाची नाही.आपण फसलोय.आता आपला शेवट येथेच होणार......
 तात्पर्य - अतिहुशारी पण कधी कधी घातक ठरते.आपण काही गोष्टी सहजतेने घेतो.पण त्यातले धोके आपल्याला माहीतच नसतात..