⚜️विज्ञान कोडे -३५⚜️


विज्ञान कोडे  - ३५


कळपात राहतो जंगल माझे घर, 
शिंगे असणारा ओळखावा नर
शिंगांच्या वैशिष्ट्यावरून ठरते माझी जात, 
धावतांना करतो सर्वांवर मात
खुरे पायाला शाखा माझ्या शिंगाला
अन्न म्हणून खातो झाडपाला गवताला,
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- हरीण (Deer)