⚜️विज्ञान कोडे -४३⚜️

विज्ञान कोडे  - ४३


नैसर्गिक व कृत्रिम असे दोन माझे प्रकार
मला देता येतो वेगवेगळा आकार,
विशिष्ट झाडाच्या चीकापासून होते माझी निर्मिती
ब्राझील देशात आढळते माझी मुबलक प्रजाती,
टणक माझ्या रूपामुळे दळणवळणात झाली क्रांती
व्हल्कनायझेशनच्या शोधामुळे तुमच्या जीवनात झाली प्रगती.

उत्तर- रबर ( Rubber)