⚜️We Learn English - दिवस एकविसावा⚜️

 ⚜️We Learn English - दिवस एकविसावा⚜️

 पाठ एकवीसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 21

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  व इतर माहिती 

 ⚜️ Read and write your notebook
(वाच आणि वहीत लिहून घे.)*

Cousin (कजिन्) - चुलत बहिण अथवा भाऊ, मावस बहिण अथवा भाऊ,मामे बहिण अथवा भाऊ,आते बहिण अथवा भाऊ, या सर्वांसाठी एकच शब्द म्हणजे Cousin हा शब्द वापरतात. 

Clap (क्लॅप) - टाळी 
Tooth (टुथ) - एक दात
Teeth (टीथ्) - अनेक दात
Tooth brush (टुथब्रश) - दात घासायचा ब्रश
Soap (सोप) - साबण
Comb (कोंब) - कंगवा 

⚜️Read carefully the following sentences and write down in your notebook. 
(रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक)
खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.

1) Shut your eyes. 
(शट् युअर आईज्) 
तुझे डोळे बंद कर. 

2) I have a comb.
(आय हॅव अ कोंब) 
माझ्याकडे कंगवा आहे. 

3) Tanu has a comb.
(आय हॅज अ कोंब) 
तनूकडे कंगवा आहे. 

4) This is my towel. 
(दिस ईज माय टॉवेल) 
हा माझा टॉवेल आहे. 

5) This is Tanu's tooth brush.
 (दिस ईज तनूस् टुथब्रश) 
हा तनूचा टुथब्रश आहे. 

6) He has a comb.
 (ही हॅज अ कोंब) 
त्याच्याकडे कंगवा आहे. 

7) She has a comb. 
(सी हॅज अ कोंब) 
तिच्याकडे कंगवा आहे. 

8) He has two books. 
(ही हॅज टू बुक्स) 
त्याच्याकडे दोन पुस्तकं आहेत. 

9) She has a Sharpener. 
(सी हॅज अ शार्पनर) 
तिच्याकडे टोकयंत्र आहे. 

10) I have a tooth brush. (
आय हॅव अ टुथब्रश) 
माझ्याकडे दात घासायचा ब्रश आहे. 




====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================