⚜️We Learn English - दिवस पंधरावा⚜️

⚜️We Learn English - दिवस पंधरावा⚜️

 पाठ पंधरावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 15


⚜️Read carefully the following questions and write down in your notebook. 


(रीड केअरफुली द फॉलविंग क्वेशन्स अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक) 

खालील प्रश्न काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे. 

1) Whose book is this? 
(हुज बुक ईज दीस?) 
हे कोणाचे पुस्तक आहे? 

Answer - This is Ram's book. 
(दीस ईज रामस् बुक) 
हे रामचे पुस्तक आहे. 

2) Whose notebook is this? 
(हुज नोटबुक ईज दीस?) 
ही कोणाची वही आहे? 

Answer - This is Raju's notebook. 
(दीस ईज राजूस् नोटबुक) 
ही राजूची वही आहे. 

3) Whose pencil is this? 
(हुज पेन्सिल ईज दीस?) 
ही कोणाची पेन्सिल आहे? 

Answer - This is Arohi's pencil. 
(दीस ईज आरोहीस् पेन्सिल ) 
ही आरोहीची पेन्सिल आहे. 

4) Whose ruler is this? 
(हुज रूलर ईज दीस?) 
ही कोणाची फुटपट्टी आहे? 

Answer - This is Prachi's ruler. 
(दीस ईज प्राचीस् रूलर) 
ही प्राचीची फुटपट्टी आहे. 

5) Whose rubber is this? 
(हुज रबर ईज दीस?) 
हे कोणाचे खोडरबर आहे? 

Answer - This is Nitin's rubber. 
(दीस ईज नितीनस् रबर) 
हे नितीनचे खोडरबर आहे. 

खालील शब्द वाच आणि ते वापरून वरीलप्रमाणे Whose...... चे प्रश्न तयार कर व उत्तरे लिही.

1) House (हाऊस) - घर
2) Car ( कार) - मोटारकार 
3) School Bag. (स्कूल बॅग) - दप्तर 
4)  Eraser (इरेझर) - खोडरबर
5) Sharpener (शार्पनर) - टोकयंत्र 
6) Pen (पेन) - पेन
7) Motorcycle (मोटरसायकल) 
8) Handkerchief (हॅण्डकरचिफ) - हातरूमाल 

एखाद्या मुलाची वस्तू त्याचे नाव न घेता कशी सांगाल ?
This is his book.
(दीस ईज हीज् बुक) 
हे त्याचे पुस्तक आहे. 

एखाद्या मुलीची वस्तू तिचे नाव न घेता कशी सांगाल ?
This is her notebook.
(दीस ईज हर नोटबुक) 
ही तिची वही आहे. 





====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================