⚜️उतारा क्र.10⚜️

                      ⚜️उतारा क्र.10⚜️   

⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

    लहान मुलांना कासव आवडते. कासव हा पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे. म्हणून 'उभयचर' म्हणतात. कासव पाण्यातील जीवजंतू खाऊन पाणी साफ करते. म्हणून विहिरीत कासवे पाळण्याची पद्दत आहे. कासव अतिशय खादाड व चिवट असते. म्हणूनच निसर्गाच्या रहाटगाडग्यात युगानुयुगे कासव टिकून राहिले. 'डायनोसोर हा एक अतिशय पुरातन आणि प्रचंड आकाराचा प्राणी होता. कालांतराने पृथ्वीवरील बऱ्याच प्राण्यांचा संहार झाला. त्यातच "डायनोसोर" या प्राण्याचा नाश झाला. पण कासवाचा जन्म या 'डायनोसोर च्या पूर्वीचा. कासव मात्र टिकून राहिले. 
प्रश्न:-

1) कासव चिवट आहे हे कशावरून ?

(1 ) ते खादाड आहे    (2) ते पाणी साफ करते

(3) अनेक प्राण्यांचा संहार झाला तरी ते टिकून आहे     (4) ते उभयचर आहे 


2) कोणाच्या पूर्वी कासवाचा जन्म झाला ?

(1) सशाच्या    (2) डायनोसोरच्या 

(3) सॅटेलाईटच्या     (4) जंतूंच्या 

3)' उभयचर' म्हणजे काय ?

(1) पाण्यात व जमिनीवर राहतो तो    (2) विहिरीत राहतो तो

(3) जीवजंतू खातो तो    (4) पाण्यात व आकाशात राहतो तो.