⚜️उतारा क्र.11⚜️

⚜️उतारा क्र.11⚜️   

⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

        राजू उन्हात गेला. त्याच्या एका हातात भिंग व दुसऱ्या हातात कागद होता. त्याने भिंग कागदावर अशा रीतीने धरले की, प्रकाशाचा एक गोल ठिपका कागदावर उमटला. थोडया वेळाने त्या ठिपक्याशी कागद जळू लागला. आगपेटीतील काही न पेटयताच राजूने कागद जाळण्याची जादू केली. सूर्याच्या किरणांत उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते. सूर्याच्या किरणांत उष्णता असते. ती उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते. सूर्याच्या या शक्तीला 'सौरऊर्जा म्हणतात. सौरऊर्जेने दिये पेव्यता येतात. रेडिओ, टी.डी. चालवले जातात. सौरऊर्जेवर मोटारी चालवण्याचे प्रयोग केले जात आहेत. सौरऊर्जा हे महाग फार नसलेले इंधन आहे. 

प्रश्न:-

1) राजूने कागद कशाने पेटवला ? 

(1) माचिसने    (2) भिंगाने 

(3) सौरऊर्जेने    (4) उन्हाने


2) सौरऊर्जा है. इंधन आहे.

(1) महागडे    (2) स्वस्त

(3) परवडणारे    (4) ज्वलनशील. 


3) कोणाच्या शक्तीला सौरऊर्जा म्हणतात ?

(1) चंद्राच्या    (2) उष्णतेच्या 

(3) सूर्याच्या    (4) तान्यांच्या