उतारा क्र. 5
⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.
फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात टाकल्य तरी नीट फुलत नाहीत. घरच्या साध्या अन्नाने जशी पृष्टी येते तशी ती खानावळीतील दुधावपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाणीत असतात. झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात.
आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते. घरात वाढते व मग जगाच्या सेवेस देऊन यकते. त्याचप्रमाणे झाडे फुलांना वाढवतात, रसमय, गंधमय करतात आणि मग ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, कळत नाहीत. जगात अर्धवट कामे नीट फुलत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण व यथासांग करा.
प्रश्न :-
1) फुलांना कोठे नीट फुलू दयावे ?
(1) पाण्यात (2) देवापुढे
(3) झाडावर (4) परात
2) फुलझाडे फुलांना सुगंधी कशासाठी करतात ?
(1) जगाच्या सेवेसाठी (2) देवाच्या पूजेसाठी
( 3 ) काम नीट करण्यासाठी (4) चांगली किंमत येण्यासाठी
3 ) झाडांना फुलांच्या माता का म्हटले आहे ?
(1 ) फुलांच्या मांडीवर खेळवतात (2) फुलांना गंधमय करतात
(3) फुलांना जीवनरस पाजतात (4)फुलांना देवपूजेसाठी देतात.