⚜️उतारा क्र. 6⚜️

 ⚜️उतारा क्र. 6⚜️


⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.


    माणसे खेळ पाहतात. खेळावरची मासिके वाचतात. टी. व्ही. समोर बसून अथवा पडून क्रिकेटची मॅच पाहतात, आपली टीम विजयी झाली तर फटाकेसुद्धा वाजवतात. पण स्वतः मात्र सहसा खेळत नाहीत. उलट खेळणाऱ्याा मुलांना पाहून म्हणतात, 'उठल्या सुटल्या खेळत काय बसता ?"
      खरे म्हणजे मुले आणि माणसे खूप काळ खेळत राहीली, तर कोणाचे कसलेही नुकसान होणार नाही. खेळाएवढे स्वाभाविक जीवनात काहीच नाही. म्हणून तर मुले व पिले उपजत बुध्दीने खेळत राहतात.
      पत्करलेली हार-जीत सोडली, तर खेळात ईर्षा नसावी. सर्वांनी परस्परांचे वेगळेपण विसरून खेळावे आणि आनंद लुटावा, केवळ पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक यांसाठी खेळाचे सामने नसावेत. खेळात काही डाव असतात. काही पेच असतात. पण क्षुद्र डावपेच असावेत पत्ते, कॅरम, सोंगटया हे बैठे खेल केवल रंजनप्रधान असतात. यात धावपळ नसते. आनंदाचे भरते नसते. याला खेळ म्हणू नये. आनंदासाठी आट्यापाट्या, हुतुतू, सुरपारंब्या, लंपडाव, टिपऱ्या असे कितीतरी क्रिडाप्रकार आहेत.
प्रश्न :-
1) माणसांच्या वागण्यात कोणता दोष आढळतो ?
(1) टी. व्ही. वर क्रिकेट सेंच पाहतात    (2) खेळावरची मासिके वाचतात
(3) खेळ खेळणाऱ्या मुलांना रागावतात     (4) स्वतः खेळ खेळत नाहीत

2) केवळ रंजनप्रधान खेल खालीलपैकी कोणता ?
(1) सोंगटया     (2) आट्यापाट्या
(3) टिपऱ्या      (4)सूरपारंब्या 

3) खेळामुळे होणारा महत्त्वाचा फायदा कोणता ? 
(1) मनोरंजन     (2) नकळत व्यायाम
( 3 ) प्रशस्तिपत्रक     (4) प्रसिदधी