⚜️उतारा क्र. 7⚜️

 ⚜️उतारा क्र. 7⚜️  

⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

    लोक टक लावून झाडवर बघत होते. झाडावर बऱ्याच कावळ्यांचा कलकलाट चालू होता. एक खार अस्वयपणे इकडून तिकडे धावपळ करीत होती. एका फांदीवर तुटलेल्या पंतगाच्या दोरीत अडकलेल्या एक बुलबुल पक्षी धडपडत होता आणि त्या धडपडीने जास्तच गुरफटला जात होता. तशातथ एक कावळा त्याला टोचण्यासाठी मधून-मधून झेप घेत होता. कावळ्याने त्याला मारू नये म्हणून काही लोकांनी आरडाओरडा केला. कुणी खडे फेकून मारले, पण व्यर्थ!
   एवढ्यात 10-12 वर्षांचा एक भिकारी मुलगा तेथे आला. सुटकेसाठी बुलबुलाची चाललेली केविलवाणी धडपड त्याला पाहवेना. क्षणाचाही विचार न करता तो माकडासारखा झाडावर भरभर चढून गेला. अर्धमेला झालेल्या बुलबुलाला त्याने हळुवारपणे हातात धरले. पंखांत गुंतलेली पतंगाची दोरी सोडविली आणि खाली उतरला. समोरच्या नळावर गेला. त्यांने बुलबुलाला पाणी पाजले व त्याचे अंग गार पाण्याने भिजवले. थकलेल्या बुलबुलाला आता चांगली तरतरी आली. आपले हात उंचावून मुलाने त्याला सोडून दिले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या चिमुकल्या पक्ष्याने मंजुळ आवाज करीत मुलाभोवती 3-4 घिरटया घातल्या व झाडावर जाऊन बसला. त्याने फांदीवर झोके घेतले, ते पाहून मुलाला खूप आनंद झाला. जमलेल्या लोकांनी कौतुकाने टाळ्या पिटल्या व त्या मुलाला बक्षीस दिले. 

प्रश्न:-
 
1 ) लोक झाडावर टक लावून काय बघत होते ?
(1) कावळ्यांचा कलकलाट    (2) खारीची धावपळ
(3) दोरीत अडकलेला बुलबुल    (4) तुटलेला पतंग

2 ) मुलाने झाडावर चढून बुलबुलाची सुटका का केली?
(1) साहस दाखविण्यासाठी    ( 2 ) बुलबुलाचे प्राण वाचविण्यासाठी
(3) बक्षिस मिळविण्यासाठी    (4) पतंग मिळविण्यासाठी

3 ) सोडलेल्या बुलबुलाने मुलाभोवती घिरटया का घातल्या ?
(1) आनंद व्यक्त करण्यासाठी    (2) अन्नपाणी मिळविण्यासाठी
(3) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी    (4) लोकांना घाबरविण्यासाठी