⚜️फराळा मागची फिलॉसॉफी⚜️

      ⚜️फराळा मागची फिलॉसॉफी⚜️

दिवाळीतल्या फराळा कडून काहीतरी शिकायचं असतं
 मनाला मंगल विचाराचं उटणं लावायचं असतं

चकली, जिलबी सांगत असते मतांचा गुंता करू नका
खमंग गोडवा नात्यातला कधीच कमी होऊ देऊ नका

प्रत्येक लाडू सांगत असतो एकजीव झालं पाहिजे
माणसानं माणसाला नेहमी गोड बोललं पाहिजे

बासुंदी अन गुलाबजाम फार मोठे तत्त्ववेत्ते
सांगतात चटके बसल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नसते

खमंग चिवडा असल्या शिवाय दिवाळीची मजाच नाही
मुरमुरे, पोहे सांगत असतात गरीबाला दूर लोटायचं नाही

मुरड घातलेली करंजी आपल्याला सतत सांगत असते
स्वतः मौन धारण करून दुसऱ्याला गोडी द्यायची असते

श्रीखंड आपल्याला म्हणीत असतो Cool, Cool राहायचं असतं
कसाही मौसम असला तरी डोकं थंड ठेवायचं असतं

नियम कुणीच तोडू नका म्हणे  सुधारस , बालुशाही
कोणताही निर्णय घेतांना हो जपून ठेवा लोकशाही

फराळाच्या डिश मधूनबरंच तत्वज्ञान कळालं
पारंपारिक पदार्थातून खूप ज्ञान मिळालं.  

🏮🪄🪔💥🌞🌻

=====================================================================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com

=====================================================================