⚜️हंस वाहिनी सरस्वती⚜️

 ⚜️हंस वाहिनी सरस्वती⚜️

हंस वाहिनी सरस्वती, हंस वाहिनी सरस्वतीच्या, 
पदकमली रमते, माझे मन पावन होते  ll धृ.ll

वीना हाती मंजुळ वादन, श्वेत कमल हे मंगल आसन
राजहंसतव राजसवाहन,  घे वंदन माते ll१ll

मुर्ती साजरी नयन मनोहर, धवल वस्त्र किती शोभे सुंदर
चंद्रही लाजे उदार अंबर,  भारावून जाते ll२ll


प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.