⚜️आकाशातल्या चंद्रा⚜️
आकाशातल्या चंद्रा, मला हसायला शिकव,छान छान छान मला हसायला शिकव.
पिंजऱ्यातल्या पोपटा मला बोलायला शिकव,
गोड गोड गोड मला बोलायला शिकव.
समुद्रातल्या माशा मला पोहायला शिकव,
छान छान छान मला पोहायला शिकव.
जंगलातल्या मोरा मला नाचायला शिकव
थुई थुई थुई मला नाचायला शिकव.
शाळेतल्या बाई मला वाचायला शिकव,
खूप खूप खूप मला वाचायला शिकव.
शाळेतल्या बाई मला लिहायला शिकव,
खूप खूप खूप मला लिहायला शिकव.