⚜️आपण सारे संगतीने ⚜️

⚜️आपण सारे संगतीने ⚜️

आपण सारे संगतीने 
खेळ खेळूया गमतीने. 

मांडू खेळ भातुकलीचा 
बाहुला बाहुलीच्या लग्नाचा. 

नक्कल करूया आईची 
खोडी काढूया ताईची. 

बाबांच्या पाठीवर सपाटा
दादाला घालू धपाटा. 

चिऊला दाणे देऊ या
माऊच्या मागे धाऊया.

धुड धुड धुडगुस घालू या
 बडबड गाणी गाऊ या...