⚜️प्राण्यांची गंमत⚜️
आलं आलं माकड त्याला लागली भूक
आंबा केळी खाऊन करते हुप हुप
आला आला ससा दिसतो तरी कसा
ढगांच्या चादरीत बसलाय जसा
आलं आलं मांजर आहे फार हौशी
म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी
शेवटी आलं कोण? ती पहा माझी गाय
वासराला गोंजारते वाटे जणू माझी माय...