⚜️ भावले भावले⚜️

⚜️ भावले भावले⚜️

(संवाद गीत)
भावले भावले, तू अशी कशी ?
 हात नाही धुवीत, दात नाही घाशीत 
दुधाची फोडतेस पेलाबशी 
भावले भावले, तू अशी कशी ?
मोडतेस फणी, सोडतेस वेणी
 कुंकवाने कपाळ रंगवशी 
भावले भावले, तू अशी कशी ?