⚜️गोरि गोरि पान⚜️
गोरि गोरि पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ॥धृ॥
गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी
अंधाराच्या साडीला, चांदण्यांची खड़ी
चांदण्यांच्या खडीला, बिजलीचा वाण ॥१॥
वहिनीला आणायला, चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला, हरणांची जोड़ी
हरणांची जोडी तुडवी, गुलाबाचे रान ॥२॥
वहिनीशी गट्टी होता, तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांशी खेळताना, दोघे आम्ही सान ॥३॥