⚜️सदा या देशसेवेचा⚜️
सदा या देशसेवेचा,
मनाला ध्यास लागावा ॥धृ॥
उमाळा देशप्रेमाचा, उमाळा देशभक्तीचा
आम्हाला येवू दे देवा ॥१॥
प्रभुची बालके आम्ही, बंधुता इच्छितो स्वामी
आमुचा हेतु पुरवावा ॥२॥
अहिंसा ब्रीद हे आमुचे, सत्यता ध्येय हे आमुचे
जगाची करावया सेवा ॥३॥