⚜️प्रयत्नांची मर्यादा⚜️

 ⚜️प्रयत्नांची मर्यादा⚜️

     एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला, पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. ते पाहून त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, 'एका सशाने पळण्यात तुला हरवावे?' 
    यावर तो कुत्रा म्हणाला, “धनी, माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्याकरिता होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी होते. तेव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे हे साहजिकच नाही का ?'

तात्पर्य :- जेव्हा एखाद्याच्या जिवावर बेतते तेव्हा आलेल्या प्रसंगातून स्वतःला वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा नसते.