⚜️ उतारा वाचन भाग ८४⚜️
झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो. यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.
⚜️ खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) जमिनीची धूप कशामूळे कमी होते ?
२) माती कोण घट्ट धरून ठेवतात ?
३) जमिनीचा पोत कशामुळे टिकून राहतो ?
४) चांगले पीक कशाच्या मदतीने घेता येते ?
५) मोठे कर्ज कोणाला काढावे लागणार नाही
६) झाडाझुडपांमुळे कशाची धूप कमी होते ?
७) झाडाची मुळे काय धरून ठेवतात ?
८) काय झाले तर गरीब शेतकऱ्यांना मोठे कर्ज काढावे लागणार नाही ?
९) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही.
१०) उताऱ्यातील अनुस्वारयुक्त शब्द लिही.
११) 'कृत्रिम' च्या विरुद्धार्थी शब्द लिहा.
१२) 'कर्ज' यासारखे रफार असणारे अजून १० शब्द लिहा.
१३) वृक्ष संवर्धनासाठीचे पाच घोषवाक्ये लिहा.
१४) विरुदयार्थी शब्द सांगा.
- गरीब x .........,
- चांगली x .........
१५) झाडांचे उपयोग लिहा.
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421