⚜️उतारा वाचन भाग ९७⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ९७⚜️

    रविवारची चाहूल शनिवारपासूनच लागते. शनिवारी शाळा अर्धा दिवस असते. ती रविवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहते. म्हणून रविवारच्या खालोखाल सगळ्यांना शनिवार आवडतो. शनिवार-रविवार हे जणू भाऊ-भाऊच ! शुक्रवारी तसा समजूतदार असतो. कारण दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस शाळा असते ना !

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) रविवारची चाहूल कधीपासून लागते ?
२) शनिवारी किती वेळ शाळा असते ?
३) रविवार संध्याकाळ पर्यंत काय चालू असते ? 
४) रविवार खालोखाल कोणता वार सगळ्यांना आवडतो ?
५) कोणते वार हे जणू भाऊ-भाऊ आहेत ?
६) कोणता वार समजूतदार असतो ?
७) सगळ्यांना शुक्रवार समजूतदार का वाटतो ? 
८) कोणत्या वाराची चाहूल शनिवारपासूनच लागते ? 
९) अर्धा दिवस शाळा कोणत्या वारी असते ?
१०) उताऱ्यात किती वारांची नावे आली आहेत ?
११) आठवड्याचे एकूण वार किती व कोणते ?
१२) उताऱ्यातील जोडाक्षरयुक्त शब्द लिही. 
१३) 'ती संध्याकाळपर्यंत सुरु राहते.' या वाक्यातील सर्वनाम कोणते ?
१४) 'समजूतदार' या सारखे आणखी शब्द लिही.
१५) 'रविवार माझ्या आवडीचा' या विषयावर दहा ओळी लिही.
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
📞9421334421