⚜️कविता 1⚜️

⚜️इवलेसे घर⚜️

इवलेसे घर
घरात कोण?
बाबांचा कसा
वाजतो फोन..

आई माझे
लाड करी,
मी तिची
सोनू परी...

ताई माझी
गोरी पान,
खोडी काढता
धरते कान..

दारापुढे एक
फिरते खार,
इवल्याशा घरात
माणसे चार....

स्वाध्याय
प्रश्नअ)एका शब्दात उत्तर सांगा.
  1. इवल्याशा घरात माणसे किती?
  2. दारापुढे कोण फिरते?
  3. सोनुचे लाड कोण करते?
  4. बाबांचा काय वाजत आहे?
  5. ताई कशी आहे?
  6. ताई कोणाचे कान धरते?
  7. 'आई'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
  8. 'कान'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
  9. घर कसे आहे?
  10. 'गोरा' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
  11. कवितेत आलेली जोडाक्षरे शोधा.