⚜️चिमण्यांनो अंगणी माझ्या या गं⚜️
चिमण्यांनो अंगणी
माझ्या या गं,
दाणे देईन तुम्हाला
दाणे टिपाया या गं
अंगणात आहे झाडे
सावलीत त्यांच्या या गं,
वारा येई गार गार
आराम जरा करा गं
आंब्याचं झाड कसं
आहे डेरेदार गं,
पिल्लांसाठी घरटे
छान छान बनव गं
शाळा तुझी मजेदार
भरली किती छान गं,
फेर धरुनी नाचाया
मैत्रिणी किती जमतात ग.....
स्वाध्याय
प्रश्नअ)एका शब्दात उत्तर सांगा.
- अंगणात काय आहे?
- आंब्याचं झाड कसे आहे?
- घरटे कोणासाठी बनवायचे आहे?
- कोणाची शाळा भरली आहे?
- अंगणात कोणाला यायला सांगत आहे?
- दाणे टिपायला कोण येणार आहे?
- 'वारा'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा?
- 'गार' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा?
- 'शाळा'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा?
- कवितेतील जोडाक्षरे शोधा
- तुमच्या अंगणात, आजूबाजूला कोणकोणते पक्षी येतात?