⚜️झाडे⚜️
अंगणात मोठे झाड
दिसे कसे हिरवेगार,
खेळ खेळण्या झोक्याचा
मुले जमती फार
झाडावरती पक्षी
होती किती गोळा,
मोजण्याची गंमत
भरली सारी सोळा
झाडाची सावली
थंडगार वारा,
उन्हात झाडाखाली
घ्यावा आसरा
आला पावसाळा
झाडे लाव बाळा,
झाडांना वाढवुनी
फुलवू आपला मळा
स्वाध्याय
१)अंगणात काय आहे?
२)झाडावरती किती पक्षी गोळा झाले?
३)पावसाळ्यात काय लावावे?
४)मुले कोणता खेळ खेळण्यासाठी जमतात?
५)कवितेत कोणती जोडाक्षरे आलेली आहे?
६)तुमच्या दारापुढे कोणकोणती झाडे लावलेली आहे?
७) 'गार 'शब्दाने शेवट होणारे कवितेत आलेले शब्द शोधा.
८)'झाड'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
९)'मोठे' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
१०)झाडांचा आपल्याला काय काय उपयोग होतो?
११)'र' या मुळाक्षराने शेवट होणारे शब्द कोणते आहेत?