⚜️चांदोबामामाची सफर⚜️
स्वप्नात एकदा माझ्या
चांदोबामामा आला
उंच आभाळी,रथातून
वर घेऊन गेला
रथाला होती दोन
सुंदर हरणाची जोडी
काळ्या पाठीवरी त्यांच्या
चकाकणारी खडी
वर जाता कसा
शीळ घाली वारा
ढगावरती किती
चांदण्या फिरे गरागरा
किती किती चांदण्या
चमचम करिती
हळूच हात लावता
दूर दूर पळती
हातात दिली चांदोबाने
छोटी चांदणी
घेऊन जा म्हणाला
तुझ्या ही अंगणी
खूप छान होती
चांदोबामामाची सफर
खरे कर स्वप्न देवा
तुला देईन एक नारळ
स्वाध्याय
१)मुलाच्या स्वप्नात कोण आलं?
२)मुलाला कोठे घेऊन गेला?
३)रथाला कशाची जोडी होती?
४)हरणाच्या पाठीवर काय आहे?
५)चांदण्या कशा फिरतात?
६)मुलाच्या हातात चांदोबाने काय दिलं?
७)स्वप्न खरं केल्यावर चांदोबाला काय मिळणार आहे?
८)कवितेत किती जोडाक्षरे आलेली आहे?
९)'ढग' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
१०)'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
११)'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा