⚜️कविता 5⚜️

⚜️मस्त फिरु रे⚜️

मस्त फिरू रे
मस्त फिरू
फिरता फिरता
झाडे ,वेलींना
आपलेसे करू

मस्त फिरू रे
मस्त फिरू
फिरता फिरता
प्राणी,पक्ष्यांशी
 दोस्ती करू

मस्त फिरू रे
मस्त फिरू
फिरता फिरता
बागेतील सारा
कचरा उचलू

मस्त फिरू रे
मस्त फिरू
फिरता फिरता
घर,परिसर
स्वच्छ राखू
मस्त फिरू रे

मस्त फिरू
फिरता फिरता
चालू नळ बंद करून
पाण्याची बचत करू

मस्त फिरू रे
मस्त फिरू
फिरता फिरता
हिरव्या निसर्गाशी 
मैत्री करू

स्वाध्याय

१)आपलेसे कोणाला करावे?
२)दोस्ती कोणाशी करावी?
३)पाणी कसे वाचवाल?
४)घर परिसर कसा ठेवावा?
५)'मित्र'शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
६)'झाड 'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
७)'पक्षी'शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
८)कवितेतील जोडाक्षरे शोधा.