⚜️सर्व धर्म समभाव गीत - वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी ⚜️

⚜️वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी ⚜️ 

वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी
वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी 
हिन्दू मुस्लिम सिख अन् ख्रिस्ती सारे एकच आम्ही 
सारे एकच आम्ही,सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही ॥धृ॥

कुणी उडियायी, कुणी मराठा, कुणी तामिळी आप्पा
अय्यो अय्यो करिता करिता रंगून जाती गप्पा 
आड ने येई भाषा अथवा वेश न् आणि कमी ॥ 1

कुठे बसंती, कुठे पंचमी अथवा दुर्गामाता
पोळा,पोंगल, ईद ही राहो, इथे ही नांदो समता 
रंग ढंग जरी वेगवेगळे प्रेम दिसे हो नामी॥ 2

कुचीपूरी वा मनीपूरी वा असो भांगडा प्यारा 
आनंदाने फुलून उठतो भारत वर्ष हा सारा 
नृत्य संस्कृती व्रते सांगती धर्म ना कुठला छदमी ॥ 3॥

उच्च निच्चता नाही मुळची, नाही जाती भेद 
सर्व धर्म समभाव सांगती आचरण व्हावे शुध्द 
घडो ना हिंसा हातून माझ्या जीवन लागो कामी ॥ 4॥