⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 205वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 205वा⚜️ 

   जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य असे संस्कार बालवयापासून होणे गरजेचे असतात. चांगले काय? आणि वाईट काय? याची जाण लहान बालकांना नसते. बालवयात हळूवार, प्रेमाने, हसतखेळत आनंददायी वातावरणात त्यांच्या नकळत वाढत्या वयाबरोबर त्यांना चांगल्या सवयी लावाव्या लागतात. या सवयी म्हणजेच संस्कार. 
      "विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा" या उपक्रमांतर्गत रोज संस्कार व मूल्यशिक्षण या विषयाशी  निगडीत सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत..

आजचे प्रश्न.
  1. क्रिकेटमध्ये चेंडू फेकणाऱ्याला आपण काय म्हणतो?
  2. मुळा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? 
  3. हिऱ्याचा वापर कशासाठी केला जातो?
  4. आपण हातात ज्याठिकाणी घड्याळ घालतो त्या भागाला काय म्हणतात? 
  5. अशी कोणती जागा आहे जिथे पोलीस काम करतात? 
  6. दोरी फिरवण्यासाठी आपण शरीराचा कोणता भाग वापरता? 
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर